Breaking News

पालिकेच्या ऑनलाईन पेमेंट सुविधेचे उद्या उद्घाटन

सांगली, दि. 01 - महापालिकेने क1शलेस होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत आता नागरिकांना ऑनलाईन पमेंटची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.  सोमवारी 2 जानेवारी रोजी महापौर हारुण शिकलगार व जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते या सुविधेचे उद्घाटन होत आहे, अशी माहिती उपायुक्त  सुनिल पवार यांनी दिली. यावेळी उपमहापौर विजय घाडगे, स्थायी समितीच्या सभापती संगीता हारगे, गटनेते किशोर जामदार, आयुक्त रवींद्र खेबुडकर उपस्थित  राहणार आहेत.शासनाच्या रोकडरहित प्रशासन संकल्पनेच्या धर्तीवर नागरिकांना महापालिकेच्या संकेतस्थळाव्दारे ऑनलाईन पेमेंट करता येईल. तसेच पालिकेच्या  नागरी सुविधा केंद्रामध्ये क्रेडिट व डेबिट कार्डाव्दारे घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर भरण्याची सुविधा सुरु करण्यात येत आहे. पालिकेच्या करांचा भरणा  करण्यासाठी आता नागरिकांना कार्यालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. ते कोठूनही ऑनलाईन पेमेंट करु शकतात. या उपक्रमांसाठी महापौर शिकलगार  व आयुक्त खेबूडकर यांनी पाठपुरावा केला होता, असेही पवार म्हणाले.