Breaking News

तुरची-चिंचणीच्या युवकात हाणामारी

सांगली, दि. 01 - तालुक्यातील तुरची व चिंचणीच्या महाविद्यालयीन तरुणांमध्ये भारती कॉलेज परिसरात सकाळी जोरदार मारामारी झाली. विटा फुटेपर्यंत  एकमेकांना मारहाण करण्यात आली. बसमध्ये लोढ्याच्या युवकाचे केस चिंचणीच्या युवकाने मस्करीत ओढल्याने हा वाद सुरु झाला. या घटनेमुळे महाविद्यालयीन  तरुणांमध्ये दिवसभर तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी धरपकड करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणाच हाती लागले नाही.
लोेढे येथून तासगावला येणार्‍या एका महाविद्यालयीन युवकाचे केस बसमध्ये चिंचणीच्या एका युवकाने मस्करीत ओढले. यावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली.  तासगाव येथे येताच त्या युवकाने तुरची येथील आपल्या मामाला या घटनेची माहिती दिली. यावेळी तुरची गावातील काही महाविद्यालयीन युवकांनी भारती  कॉलेजमधील या युवकास जाब विचारण्याचे ठरवले. तो युवक तिथे आल्यावर त्यांच्यामध्ये बाचाबाची होऊन दोन गटात मारामारी झाली. यावेळी युवकांनी  एकमेकांचा पाठलाग करुन विटांनी बेदम मारहाण केली. यावेळी पोलिसांकडून धरपकड करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र कुणी हाती लागले नाही.
सहा महिन्यात तब्बल 33 जणांच्यावर या दोन्ही कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. सांगली पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच सहा महिन्याच्या  काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. अजून गुंडाच्या दोन टोळ्या पेालीसांच्या रडारवर असून त्यांच्यावरही लवकरच कारवाई करण्यात  येईल असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.