पोलीस ठाणे प्रभारी अधिकार्यांना अधिकार प्रदान
पुणे, दि. 01 - महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिक्षक (ग्रामीण) डॉ.जय जाधव यांनी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी यांना 12 जानेवारी,2017 च्या रात्रौ 12 वाजेपर्यंत अधिकार प्रदान केले आहे.
यानुसार रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणार्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे त्यांनी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे, अशा कोणत्याही मिरवणुका कोणत्या मार्गाने कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे, सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याहून किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे, सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर सर्व धक्कयावर व धक्कयामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल,ताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कष वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणूकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होवू नये म्हणुन ध्वनीक्षेपकाचा (लाऊड स्पीकर) उपयोग करणेचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देणे, सक्षम प्राधिकार्यांनी या अधिनियमांची कलमे 33,35,37 ते 40,42,43 व 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देण्यास प्राधिकृत केले आहे.