Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसकडून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना अभिवादन

नाशिक, दि. 03 -  नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आली.
यावेळी सावित्रीमाई यांच्या कार्याची माहिती देताना शहर उपाध्यक्ष कुंदा सहाणे म्हणाल्या की, स्त्री व शुद्र यांच्या शिक्षणाची परवड थांबवण्याचे महत्वपूर्ण कार्य  त्यांनी अविरतपणे केले. त्यामुळेच आज पतित स्त्रियांचा उध्दार तसेच अनाथ, अर्भक यांचे संरक्षण व संवधन यांचा शासनप्रणीत कार्यक्रम सुरु झालेला आहे.  सावित्रीमाई फुले यांनी  महात्मा फुले यांनी सुरु केलेल्या सत्यशोधक समाजाचे कार्यही मोठ्या हिमतीने पुढे नेले त्या बालहत्या प्रतीबंधक गृहामध्ये बालकांची  अनेक प्रकारे काळजी घेत. त्यांच्या पोटी मुल बाल नसल्यामुळे त्यांनी 1874 मध्ये ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला. पुढे त्याला पोटाच्या मुलाप्रमाणे शिकवून  डॉक्टर केले. अष्टपैलू, सर्वगुण संपन्न, अभ्यासू, व्यासंगी शिक्षिका अशा सावित्रीमाईंना लाख लाख प्रणाम.
या जयंतीप्रसंगी प्रांतिक सदस्य मुख्तार शेख, शहर सरचिटणीस संजय खैरनार, भारत जाधव, नगरसेविका रंजना पवार, रंजना गांगुर्डे,संजीवनी गायकवाड, चीद  निकम, नाना पवार, कोमल साळवे, सिद्धांत सहाणे  आदि पदाधिकारी  व कार्यकर्ते उपस्थित होते.