रस्ते बांधकामातून दळणवळण सुविधांचा विकास - गुलाबराव पाटील
जळगाव, दि. 03 - जळगाव ग्रामीण मतदार संघातील रस्ते विकासासाठी शासनाने 180 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला असून त्यामाध्यमातून ग्रामिण भागात दळणवळण सुविधांचा विकास होईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आसोदा येथे केले.
आसोदा ता. जळगाव येथील विविध विकासकामांचा शुभारंभ व उद्घाटन समारंभानंतर पाटील हे उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधत होते. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य बळीरामदादा सोनवणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे आमदार सुरेश दामू भोळे हे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी आसोदा ग्रामस्थांच्या वतीने पाटील यांना शाल श्रीफळ, पुष्पहार, बैलगाडीचे स्मतिचिन्ह देऊन भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी आसोदा परिसरातील गावांना जोडण्यार्या विविध रस्त्यांसह 11 हायमास्ट लॅम्पचे भूमिपूजन गुलाबराव पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, आसोदा गावासाठी 2 कोटी 93 लाख 59 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यात असोदा ते भोलाणे रस्ता-27.69 लाख रुपये, सुजदे फाटापासुन आसोदा रस्ता 23.90 लाख रुपये, आसोदा ते भोलाणे रस्त्यावरील लहान पुलाचे बांधकाम-30 लाख रुपये, आसोदा ते ममुराबाद रस्ता डांबरीकरण-60 लाख रुपये, भोलाणे- भादली-नशिराबाद रस्त्योच डांबरीकरण-27 लाख रुपये, ममुराबाद-आसोदा-तरसोद रस्ता डांबरीकरण- 1 कोटी 25 लाख रुपये या रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. तसेच जळगाव-आसोदा-भादली रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी 81 लाख रुपये निधी गुलाबराव पाटील व आ. सुरेश भोळे यांच्या प्रयत्नातून प्राप्त झाले आहेत. तसेच आसोदा गावासाठी तब्बल 11 हायमास्ट लॅम्प बसविले जाणार आहेत.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पाटील म्हणाले की, आसोदा गावातील सर्व गल्ल्या सिमेंट काँक्रीटच्या करण्यात येतील. या भागातील शेतीला 125 कोटी रुपये खर्च करुन भूमिगत पाईपलाईनद्वारे शेळगाव बॅरेज मधून पाणी दिले जाणार असून त्यामुळे कालव्यांसाठी शेतजमीन अधिग्रहीत करण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. क्रीडा संकुल उभारण्यासाठी 1 कोटी 50 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 100 गावांमध्ये आसोदा गावाच समावेश असून डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 125 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तसेच गावात वाल्मिक मंदिरासाठी 10 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमास शिवसेना महिला आघाडीच्या महानंदा पाटील, शोभाताई चौधरी, तुषार महाजन, भास्कर महाजन, राजेंद्र सोनवणे, दिलीप पाटील, किशोरभाऊ चौधरी, अनिल महाजन, नाना कुलकर्णी, सुदाम पाटील, छगन खडसे, अरुण माळी, डॉ.कदम तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्र संचालन डॉ. गोकुळ सपकाळे यांनी तर आभार प्रदर्शन दीपक सैंदाणे यांनी केले.