Breaking News

जळालेले रोहित्र न बदलणा-या अभियंत्याच्या निलंबनाचे आदेश

औरंगाबाद, दि. 02 - वैजापूर तालुक्यातील भगूर येथे 7 महिन्यांपासून जळालेले रोहित्र बदलून दिले नसल्याची धक्कादायक माहिती जिल्हा विद्युतीकरण च्या  बैठकीत उघड झाले असून शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित तत्कालीन कनिष्ठ अभियंता मोरे यांना निलंबित  करण्याचे आदेश बैठकीत दिले.
महावितरणच्या मिल कॉर्नर येथील परिमंडळ का-यालयाच्या सभागृहात जिल्हा विद्युतीकरण समितीची बैठक खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली पार  पडली. जिल्हा परिषदेच्या शाळांना नाममात्र दरात वीज देण्याचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. सोयगाव, कन्नड, वैजापूर मधील मंजूर डीपी ठेकेदार मंजूर  असतांनाही शेतकर्यांना वेठीस धरत असल्याचे उघड होत असतांना त्यांच्यावर कारवाई का करत नाही असा सवाल करत काम ना करणा-या ठकेदारांचे कंत्राट  रद्द करण्याचे निर्देश खासदार चंद्रकांत खैरे यांनीमुख्य अभियंता गणेशकर यांना दिले.आमदार अतुल सावे यांनी मध्य विभागातील तक्रारीं सांगितल्या आमदार  भाऊसाहेब चिकटगावकरांनी वैजापूर डी पी प्रकरणातील शेतकर्यांची नावे पोलीस तक्रारीतून वगळण्याची मागणी बैठकीत केली त्यावर खासदार चंद्रकांत खैरे यांनी  कांत्राटदार व संबंधित अधिकार्यांवर पोलिसात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनीबैठकीत भगूर, चित्तरगाव प्रकरणातील दोषी  अधिकार्यांना तात्काळ निलंबी करा व रोहित्र बसवून देण्याची आग्रही मागणी बैठकीत केली.बैठकीस मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, आमदार अतुल सावे,आमदार  भाऊसाहेब चिकटगावकर,जिल्हाप्रमुख अंबादास दानवे उपस्थित होते.