गुरु गोविंदसिंग यांची 350 वी जयंती उत्साहात साजरी
। बाबाजी सुखदिपसिंग बेदी यांच्या प्रवचनाने भाविक मंत्रमुग्ध
अहमदनगर, दि. 06 - शीख, पंजाबी समाजाचे दहावे गुरु गोविंदसिंगजी यांची 350 वी जयंती शहरातील गुरुद्वारा भाई दयासिंग गोविंदपुरा येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. बोले सो निहाल...सत श्री अकाल... चा जय घोष, नगार्यांचा गजर, कथा, किर्तन, सोबतिला अखंड गुरुग्रंथ साहेबाचे पठण या धार्मिक कार्यक्रमासह भाईद्यासिंगजी गतका आखाड्याच्या युवक-युवतींनी शस्त्रांचे धाडसी प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.गुरु गोविंदसिंगजी जयंती निमित्त डेराबाबा नानक पंजाब येथून आलेले गुरुनानक देवजी यांचे वंशच बाबाजी सुखदिपसिंग बेदी यांचे प्रवचन झाले. त्यांनी गुरु गोविंदसिंग यांनी धर्म व देशासाठी दिलेल्या सर्वोस्वी बलिदानाची आठवण करुन, त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच क्रोध, काम, मोह, मत्सर व अहंकार मनातून ज्या वेळी नष्ट होईल तेंव्हाच खर्या अर्थाने ग्रुरुग्रंथ साहेबांची उपासना होईल असे मत व्यक्त केले.
माताजी प्रितम कौर चावला, हुजुरी जथ्था मनजितसिंग व गुरभेजसिंग यांच्या किर्तनाने भाविक भारावले. गुरुद्वार्याच्या आवारात परमजितसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक युवक-युवतींनी शस्त्रांचे धाडसी प्रात्यक्षिक सादर केले होते. यावेळी अध्यक्ष गुरुद्यालसिंग वाही, हरजितसिंग वधवा, जनक आहुजा, राजेंद्र चावला, गुरभजनसिंग नारंग, हितेश कुमार, बलदेवसिंग वाही, अमरजितसिंग वधवा, प्रदीप धुप्पड, प्रितपालसिंग धुप्पड, रविंद्र नारंग, हरविंदसिंग नारंग, मनिष आहुजा, गुरभिरसिंग नारंग, अजितसिंग भिंदर, किशोर कंत्रोड, संतोष गंभीर, तरन नारंग, मनयोगसिंग माखिजा, राजू मक्कर, विकी मल्होत्रा, प्रदीप पंजाबी, हरमित कथुरिया, करण नारंंग, बलदेवसिंग वाही, गुरुद्यालसिंग सागू, मंजितसिंग मक्कर, करणजीतसिंग नारंग, चरणजितसिंग मक्कर, कुलबीरसिंग वाही, इंदरपालसिंग मक्कर, कर्तारसिंग नारंग आदिसह शीख, पंजाबी व सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
31 डिसेंबर पासून जयंती निमित्त गुरुद्वार्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सलग 6 दिवस अखंड पाठ साहेब, किर्तन, कथा व लंगरचा समावेश होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हरजितसिंग वधवा यांनी केले. लंगरने कार्यक्रमाची सांगता झाली.