गुरु गोविंदसिंग शौर्य पुरस्कार अॅड.उज्वल निकम यांना प्रदान
अहमदनगर, दि. 06 - शीख, पंजाबी समाजाचे दहावे गुरु गोविंदसिंगजी यांच्या 350 व्या जयंती निमित्त शहरातील गुरुद्वारा भाई दयासिंग गोविंदपुरा येथे सचखंडवासी हरनामसिंग वधवा यांच्या स्मरणार्थ देवेंद्रसिंग वधवा व वधवा परिवारच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा गुरु गोविंदसिंग शौर्य पुरस्कार विशेष सरकारी वकिल पद्मश्री अॅड.उज्वल निकम यांना बोले सो निहाल...सत श्री अकाल... चा जय घोषात प्रदान करण्यात आला. गुरुनानक देवजी यांचे वंशच बाबाजी सुखदिपसिंग बेदी यांच्या हस्ते अॅड.निकम यांनी पुरस्कार स्विकारले.
सत्काराला उत्तर देताना अॅड. उज्वल निकम म्हणाले की, दुबळ्यांच्या रक्षणासाठी शीख समाजात कृपान वापरतात. कायदाच माझ्यासाठी कृपान असून, याद्वारे दुबळ्यांच्या न्याय हक्कासाठी माझे कार्य चालू आहे. गुरु गोविंदसिंग यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी भाग्याचे असल्याचे सांगितले. त्यांनी काम करताना त्यांच्या कारकिर्दित देश आणि समाज विघातक प्रवृत्तींना मिळालेल्या 37 आरोपींना फाशीची शिक्षा व 630 आरोपींना जन्मठेपच्या शिक्षेची माहिती दिली.प्रास्ताविकात हरजितसिंग वधवा यांनी स्मृतीचिन्ह, सन्माणपत्र व 5 हजार रु. रोख या पुरस्काराचे स्वरुप सांगून दरवर्षी देण्यात येणार्या पुरस्काराबद्दल माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत गुरुद्वार्याचे अध्यक्ष गुरुद्यालसिंग वाही यांनी केले. यावेळी न्युरो सर्जन गुरमितसिंग सहानी तसेच गतका प्रशिक्षक परमजितसिंग यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हरजितसिंग वधवा, जनक आहुजा, मोहनसिंग वधवा,सतीश गंभीर, राजेंद्र चावला,प्रदीप धुप्पड, आदिसह शीख, पंजाबी व सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.