Breaking News

बनावट नोटा प्रकरणी छबू नागरेसह साथिदारांच्या कोठडीत वाढ

नाशिक, दि. 30 - बनावट नोटा प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या छबू नागरेसह इतर संशयितांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती.  पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पोलिसांनी काल न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 2 जानेवारीपर्यंत वाढ केली आहे.
कोट्यवधीच्या बनावट नोटा छापल्याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादीचा पदाधिकारी छबू नागरेला अटक केले आहे. त्याचे खाते पोलिसांनी यापूर्वीच सील केली असून  एकूण रक्कम 58 लाख रुपयांपर्यत असल्याचे विश्‍वसनीय सुत्रांकडून समजते. बनावट नोटा छापण्याचे साहित्य यापूर्वीच त्याच्या घरातून जप्त करण्यात आले होते.  नाशिक शहर पोलीस व प्राप्तीकर विभागाने संयुक्त कारवाई करीत मुबंई-आग्रा महामार्गावरील हॉटेल जत्राजवळील परिसरात गुरुवारी मध्यरात्री 1 कोटी 35 लाख  रुपयांच्या बनावट जुन्या नोटा हस्तगत केल्या.
पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्याध्यक्ष छबू नागरे व रामराव पाटील यांच्यासह 11 संशयीतांना अटक केली होती. या प्रकरणातील सर्वच्या सर्व 11  संशयितांवर पोलिसांनी  संगनमताने  बनावट नोटा छापून या नोटा व्यवहारात आणण्याचा प्रयत्न, नोटा छापण्यासाठी सामग्री बाळगणे अशा विविध कलमान्वये  आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.