नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये पाचशेच्या नोटांची रेकॉर्डब्रेक छपाई
नाशिक, दि. 23 - नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये पाचशे रुपयांच्या नव्या नोटांची रेकॉर्डब्रेक छपाई करण्यात आली आहे. गुरुवारी एकाच दिवसात पाचशेच्या तब्बल साडे सतरा दशलक्ष नोटा छापून बेलापूरला रवाना करण्यात आल्या. पाचशेसोबतच शंभर रुपयांच्या अडीच दशलक्ष नोटाही गुरुवारच्या एका दिवसात छापण्यात आल्या. विशेष म्हणजे कालबाह्य आणि देखभालीची आवश्यकता असलेल्या मशिन्सच्या मदतीनं ही रेकॉर्डब्रेक छपाई करण्यात आली.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात चलनाची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. तेव्हापासून नाशिक प्रेसमध्ये आतापर्यंत 300 दशलक्ष नोटांची छपाई करण्यात आली. आणखी 3 महिने युद्धपातळीवर नोटा छपाईचं काम सुरु राहणार आहे. नाशिकच्या सिक्युरीटी प्रेसमधून गेल्या महिन्यात 2 कोटी 45 लाख नोटांचं हवाई उड्डाण करण्यात आलं होतं. केरळ, चंदीगड आणि चेन्नईला या नोटा पुरवल्या गेल्याची माहिती मजदूर युनियन सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी दिली होती.