पुणे मेट्रोचं आज भूमिपूजन, मोदी-पवार पुन्हा एकाच मंचावर
पुणे़, दि. 24 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन करणार आहेत. भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते होणार्या पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाआधीच काँग्रेसने, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं भूमीपूजन उरकून घेतलं. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक नेते यावेळी हजर होते.