Breaking News

पोलिस आयुक्तालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

नाशिक, दि. 23 - शहरात सामजिक, राजकीय व कामगार संघटनांची मोर्चे, निदर्शने, बंद, विविध आंदोलने,  धार्मिक सण, समारंभ, मोहिमा लक्षात घेता शहर पोलिस विशेष शाखेचे उप आयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी  5 जानेवारी 2017 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत  मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 36 अन्वये शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांना नाशिक पोलीस आयुक्तालय परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लेखी  व तोंडी आदेश देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. 
या कालावधीत आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावरील जाणार्‍या मिरवणुकीतील व्यक्तिंचे वागणे, बिभत्स व अश्‍लिल हावभाव अथवा कृत्याबाबत  आदेश देणे, ज्यामार्गाने मिरवणुक किँवा जमाव जाईल अथवा जाणार नाही ती वेळ निश्‍चित करणे, सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी  वापरावयाच्या लाऊड स्पिकरची वेळ, पद्धती, ध्वनीची तिव्रता, आवाजाची दिशा नियंत्रण करणे, रस्त्यावर  सार्वजनिक जागेवर गाणी, संगीत ड्रम्स, ताशे, ढोल  किँवा इतर वाद्ये, हॉर्न वाजवणे किँवा कर्कश आवाज करण्यावर नियंत्रण ठेवणेसाठी हे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई  पोलीस कायद्याच्या कलम 134 नुसार शिक्षेस पात्र राहील.