Breaking News

स्वामी विवेकानंद शाळेचे विद्यार्थी अविम स्पर्धेत यशस्वी

नाशिक, दि. 23 - महिंद्रा ण्ड महिंद्रा कँपनीतर्फे घेण्यात आलेल्या अविम ऑलिम्पिक स्पर्धा 2016 मध्ये महानगरपालिकच्या स्वामी विवेकानंद विद्यानिकेतन क्र. 14 च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश मिळविले. पालकमंत्री गिरीष महाजन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
स्किमर गटात रवी शर्मा, अंजली भालेराव, प्रिया नायडू आणि ऋषिकेश सुर्यवंशी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना भुपेंद्र शुक्ला यांचे मार्गदर्शन मिळाले. जेट  टॉय गटात रितु पासवान, राणी वाघमारे, अनिकेत वाघमारे आणि मुस्कान पठाण यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. त्यांना लक्ष्मिकांत संत यांचे मार्गदर्शन मिळाले.
स्पर्धेत 21 मराठी आणि 14 इंग्रजी शाळांनी सहभाग घेतला होता. यशस्वी विद्यार्थी दिल्ली येथे 7 जानेवारी 2017 रोजी होणार्‍या स्पर्धेत सहभागी होतील.  मुख्याध्यापक कचरु लभडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.