कोल्हापूर महापालिकेचा हागणदारीमुक्तीसाठी राष्ट्रीय सम्मान
नवी दिल्ली, दि. 23 - स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला हागणदारीमुक्त शहर म्हणून आज केंद्रीय नगर विकास मंत्री श्री. वैंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
येथील राष्ट्रीय माध्यम केंद्रात आज केंद्रीय नगर विकास विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेला हागणदारीमुक्त शहरासाठी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले हे प्रमाणपत्र कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर यांनी स्विकारले.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत देशातील सर्व महानगरपालिका हागणदारीमुक्त करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. या अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वप्रथम कोल्हापूर महानगरपालिका हागणदारीमुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आले. याबाबत केंद्र शासनाच्या समितीने कोल्हापूर शहराची ऑक्टोंबरमध्ये पाहणी करुन शिफारस केली होती.
हागणदारीमुक्त कोल्हापूर शहर होण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने नागरिकांसाठी पुरेशा प्रमाणात सार्वजनिक, सामुदायिक व पे ण्ड युजतत्वावरील शौचालये उपलब्ध करुन दिली. तसेच खराब व नादुरुस्त शौचालये दुरुस्त केली, झोपडपट्टी भागामध्ये खाजगी संस्थांचे सहभागातून रेडिमेड शौचालये उपलब्ध केलीत. केंद्र, राज्य व महानगरपालिका यांच्या निधीतून वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी अनुदान देण्याची योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत 750 इतकी शौचालये बांधून पुर्ण झाली आहेत. तसेच नागरिकांनी उघडयावर शौचास बसू नये म्हणून विविध प्रकारे जनजागृतीचा उपक्रम सुरु केला आहे.