Breaking News

सीमा सावळे व तानाजी खाडे यांच्यात पालिका सभागृहातच ‘हमरी-तुमरी’

पुणे, दि. 23 - येत्या काही दिवसात लागणार्‍या आचारसंहितेमुळे पिंपरी महापालिकेची आज (गुरुवारी) अखेरची सभा होती. मात्र तिचा समारोप गोडधोड  बोलण्याने न होता सभेमध्ये विद्यमान नगरसेविका सीमा सावळे व तानाजी खाडे यांच्यातील हमरी-तुमरी, शिवीगाळ आणि अक्षरशः मारायला अंगावर धावून जाणे  या प्रकारांमुळे मावळती महापालिका सभा चांगली गाजली.
महापालिका सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे होत्या. यावेळी पंतप्रधान आवास योजनेच्या विषयावर चर्चा चालू असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी  योजनेबद्दल विरोध दर्शवला यावेळी राष्ट्रवादीवर होणार्‍या आरोप हे भाजपा प्रसिद्ध वृत्तपत्राचा आधारा घेवून पेड न्यूज छापून आणतात, त्या वृत्तपत्राच्या  संपादकांनाही काय छापावे कळले पाहिजे, असा आरोप केला, तसेच हा रेड झोनचा इश्यू करतात तर यांनीच कंत्राटदाराला पैसै मिळत नाहीत म्हणून रेड झोन  तयार केला, असा आरोप करताच सीमा सावळे यांनीही राष्ट्रवादीची उणीदुणी काढण्यास सुरुवात केली. त्यावरून तानाजी खाडे व सावळे यांच्यातील वादावादी  वैयक्तिक पातळीवर आली, दरम्यान खाडे यांनी दंड थोपटले त्यावेळी सीमा सावळेही खाडे यांच्या अंगावर धावून गेल्या. त्यावेळी दोघांचाही तोल गेला व एकमेकांना  सभागृहातच शिवीगाळ सुरु झाली.
यावेळी मंगला कदम, सुजाता पालांडे, आर.एस कुमार आदींनी मध्यस्ती करुन वाद सोडवला. यावेळी दोघांनाही सभागृहाचा अवमान केला आहे, दोघांनीही  ताबडतोब सभागृहा बाहेर जावे असे आदेश महापौरांनी दिले.
मात्र सभा संपल्यानंतरही सभागृहाबाहेरही खाडे व सावळे यांच्यात शाब्दीक चकमक झाली. खाडे सरळ पक्षनेत्यांच्या कार्यालयात गेले, मात्र सावळे या पालिकेच्या  प्रवेशद्वाराजवळ त्यांची भांडणासाठी वाट बघत थांबल्या होत्या, मात्र खाडे खाली आलेच नाहीत.
त्यावेळी सावळे यांना शांत करत त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांना घरी नेले.