Breaking News

पीएमपीच्या सुपरवायझरला लाथा बुक्क्यांनी मारहाण

पुणे, दि. 23 -  अपघातग्रस्त बस चालक सहकार्‍याची भेट घेण्यासाठी   रुग्णालयात गेलेल्या पीएमपीच्या सुपरवायझरला तरुणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 
या प्रकरणी देवस सगायम क्रूस यांनी फिर्याद दिली. स्वारगेट पोलिसांनी तौफिक आणि वसीम नावाच्या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूस पीएमपीचे सुपरवायझर आहेत. त्यांचे सहकारी बस चालक किसन जगताप यांचा बुधवारी दुपारी चारच्या सुमारास मित्र  मंडळ चौकात अपघात झाला होता. अपघाताची बातमी समजताच क्रूस सारसबागेजवळील हरजीवन रुग्णालयात पोहोचले. तेथे त्यांची वसीम व त्यांच्या सोबत  असलेल्या दोन तरुणांसोबत बाचाबाची झाली. यावर त्या तरुणांनी क्रिस यांना लाथा बुक्यांनी जबर मारहाण केली. स्वारगेट पोलीस तपास करत आहेत.