Breaking News

शिवस्मारकाची पूर्वतयारी आम्हीच केली

सांगली, दि. 27 - शिवस्मारक जागेची पाहणी इतर कामे आघाडी सरकारच्या काळातील आहेत. भाजप सरकार श्रेय घेत आहे. भविष्यात सत्तेवर येऊन आम्ही  उद्घाटन करु, असा टोला आमदार जयंत पाटील यांनी भाजप सरकारला लगावला. पंतप्रझान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे नांव न घेता टीका  केली. सांगली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावण्यास कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
बोरगाव (ता. वाळवा) येथे ग्रामपंचायतीच्या अमृतमहोत्सव समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ नेते रामराव देशमुख अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष  विष्णुपंत शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी. के. पाटील, युवक अध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस बाळासाहेब  पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार पाटील म्हणाले,  पंतप्रधानांच्या नोटाबंदीमुळे सामान्यच भरडले गेले. काळे धंदेवाल्यांनी ब्लॅक मनी व्हाईट केला. ब्लॅक मनी बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी अंतिम मार्ग नव्हता. निर्णय  मंत्रिमंडळ बैठकीत हा घ्यायला हवा होता. कायदा, नियमात सुटसुटीतपणा आणल्यास उल्लंघन होणार नाही.
ते म्हणाले, जाहिरातबाजी कशी करायची हे भाजपला चांगले कळते. शिवस्मारक भूमिपूजनाला सर्व पक्षांना निमंत्रित करायला हवे होते. आमच्या काळात सर्व  नियोजन झाले. जगातील विविध स्मारकांचा अभ्यास, तज्ज्ञांचे अहवाल, खडकाची निवड याबाबी मी अर्थमंत्री असताना झाल्या. आता भूमिपूजन, जलपूजन झाले,  पण उद्घाटन आम्हीच करु 2011 मध्ये केंद्र व राज्यात आमचेच सरकार असेल.
ते म्हणाले, बोरगावने रोल मॉडेल म्हणून काम करावे. शैक्षणिक प्रगतीसाठी उपक्रम हाती घ्यावा. जि. प. निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा.
विविध विकासकामांची उद्घाटने, नवीन कामांचा प्रारंभ झाला. राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील म्हणाले, राजकारणातील बदल  विकासासाठी असावेत.
जि. प. अध्यक्ष स्नेहल पाटील, उपाध्यक्ष रणजित पाटील, उपाध्यक्ष रणजित पाटील यांची भाषणे झाली. माजी सरपंच प्रकाश पाटील, मारुती पाटील, कुमार  वाटेगावकर, विनायक पाटील, माणिकराव शा. पाटील, केशव व प्रकाश वाटेगावकर, माजी उपसरपंच पंडित चव्हाण, दिनकर वाटेगावकर, दयानंद नाईक, सुरेखा  वाटेगावकर, सुरेश पाटील, अविनाश शिंदे, विद्या शिंदे, संजय नाईक, उमेश पाटील, विकास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. विलास शिंदे, उदयसिंह  पाटील, उदयसिंह शिंदे, काशिनाथ चौधरी, यांचा निवडीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ मार्गदर्शक एस. टी. पाटील, राजारामबापू बँकेचे संचालक  माणिकराव पाटील, क्रांती पतसंस्थेचे सचिव संजय पाटील, बाळ नाना पाटील, मानाजी पाटील, युवराज कांबळे, कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील, माणिक  पाटील, युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष उत्तमराव पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. राजारामबापू कारखान्याचे संचालक कार्तिक पाटील, पाणीपुरवठा  समितीचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी संयोजन केले. सरपंच प्राकश वाटेगावकर यांनी स्वागत केले. उपसरपंच विकासराव पाटील प्रास्ताविक केले. विनय  देसाई, दत्ता फसाले यांनी सूत्रसंचालन केले. उमेश पाटील यांनी आभार मानले.