ग्रामसेवक तायडे यांच्या जाचाला कंटाळून काजेगांव वासीयांचे आमरण उपोषण
बुलडाणा, दि. 27 - काजेगांव ता.जळगांव जामोद येथील सर्वच ग्रामवासी यांनी उपविभागीय कार्यकारी अधिकारी यांचे कार्यलयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. अन्यायग्रस्त, पिडीत शेतकरी व शेतमजुर ग्रामसेवक संतोष हरीभाऊ तायडे यांचे विरुध्द पिळवणुकीला व छळाला कंटाळुन नाईलाजस्तव आमरण उपोषणाला बसले आहेत. काजेगांव येथे शौचालयातील अनुदानात प्रचंड प्रमाणात घोळ व काळाबाजार झालेला आहे. अपात्र नागरीकांना अनुदान देण्यात आले. पात्र असलेल्या शेतकरी व शेतमजुरांना अनुदान देण्यात आले नाही . पंतप्रधान आवास योजनेच्या अर्जाची पुर्तता केली नाही. ग्रामसेवक तायडे मुख्यालयी राहत नाहीत. गावात आलेच तर विशीष्ट राजकीय पुढा-याच्या घरी बसुन कार्यालयीन कामे होतात. त्यांनी आपल्या अशासकीय कामांच्या माध्यमातुन गरीब जनतेवर जबरदस्त दहशत बसवली आहे. ग्रामवासीयांनी पंचायत समीती कार्यालय जळगांव जा. येथे माहीतीच्या अधिकारात माहीती मागीतली असता कालावधी उलटुन गेल्यावरही टोलवा टोलवी ची उत्तरे दिल्या जातात.
शेवटी कोणताही पर्याय न उरल्यावर ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा पर्याय निवडावा लागला. तरी उपोषणाला बसलेले ग्रामस्थांची जिवीत्वाची जबाबदारी ही शासनाने करावी अशी उपोषण कर्त्यांची मागणी आहे. उपोषण मंडपात उपोषणसाठी 40 ते 50 ग्रामस्थ बसलेले आहेत. जो पर्यंत उपोषण कर्त्यांच्या मागण्या पुर्ण होत नाहीत व अन्यायग्रस्त नागरीकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच राहील. असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.