पत्रकार कैलास राऊत दाखल झालेले खोटे गुन्हे खारीज करण्याची पत्रकार संघाची मागणी
बुलडाणा, दि. 27 - देऊळगांव माळी येथील पत्रकार कैलास राऊत यांच्यावर 22 डिसेंबर रोजी गावातील उपसरपंच विनोद फलके यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यांसंदर्भात आज दि.26 डिसेंबर रोजी मेहकर तालुका पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ मेहकर व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी निलेश अपार यांना संयुक्त निवेदन सादर करण्यात आले. भर सभेमध्ये महिलांचा अपमान का केला असा प्रश्न पत्रकार राऊत यांनी उपसरपंच विनोद फलके यांना विचारला असता त्याने पत्रकार राउत यांना प्रथम फोनवर गलिच्छ भाषेत शिवीगाळ करुन ग्रा.पं.कार्यालयात बोलावून जबर मारहाण केली. तसेच पेपरला जर बातमी लावली तर तुला जिवे मारुन टाकू व तुझ्या परीवारातील एकालाही जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. याचा निषेध पत्रकार संघानी केला व पत्रकार राऊत यांच्यावर पोलीसांनी जे खोटे गुन्हे दाखल केले ते पुर्ण खोटे गुन्हे रद्द करण्यात यावे व सदर व्यक्तीच्या विरुध्द ताबडतोब कार्यवाही करण्यात यावी अश मागणी पत्रकार संघानी लावून धरली. निवेदन देतांना मेहकर पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चव्हाण, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे मेहकर ता.अध्यक्ष गजानन चनेवार, अ.भा.ग्रा.पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विनोद झाल्टे तसेच सर्व पत्रकार मुन्ना काळे, दत्ता उमाळे, जयचंद बाठीया, सुनिल मोरे, समाधान बोडखे, मेहकर पत्रकार संघाचे सचिव निलेश नाहटा, लक्ष्मण शिवणकर, सागर भिसे, गणेश पाटील ता.अध्यक्ष आदि पत्रकारांची उपस्थिती होती.