Breaking News

चहा विकला असता तर बरे झाले असते ः अजित पवार

पुणे, दि. 23 - चूक झाली आणि राजकारणात आलो, चहा विकला असता तर बरे झाले असते. एवढी कोट्यवधीची संपत्ती चहावाल्याकडे आहे ,  असे विधान  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यानी करताच उपस्थित नागरिकामध्ये  हशा पिकला.   तसेच 2017 मध्ये कोणत्याही नागरिकाला पैशांसाठी रांगेत उभे राहायला  लागू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुणे महापालिकेच्या  प्रभाग क्रमांक  31 कर्वेनगरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक टेनिस कोर्टचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते  बोलत होते. कार्यक्रमास महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते शंकर केमसे, नगरसेवक  दिलीप बराटे, नगरसेविका लक्ष्मी दुधाने आदी उपस्थित होते.  
अजित पवार  यांनी कार्यक्रमा त केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर तीव्र शब्दात टीका केली. ते म्हणाले की, भाजपच्या एका नेत्याच्या हट्टापायी पुणे  मेट्रोला अडीच वर्ष लागली असून यामुळे या प्रकल्पाचा खर्च देखील अडीच हजार कोटींनी वाढला. त्याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार आहे.निगडी ते कात्रज मेट्रो  झाली नाही याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली.