मळाई गु्रपतर्फे आज रक्तदान शिबिर : अशोकराव थोरात
कराड, दि. 23 (प्रतिनिधी) : बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक जणांना महाभयंकर आजारांना सामोरे जावे लागत आहे. तसेच अपघातांची संख्याही वाढत आहे. अशा वेळेस अत्यंत निकडीची गरज म्हणजे रक्त आणि याचाच तुटवडा झालेला आपणास आढळून येतो. यासाठी श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, श्री मळाईदेवी नागरी सह. पतसंस्था मलकापूर येथे दि. 23 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 2 यावेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.
अपघातामध्ये रक्तस्त्राव झालेल्या व्यक्तींना किंवा ब्लड कॅन्सरमध्ये रक्त बदल करणेसाठी तसेच ज्यांना अॅनिमिया, हिमोफिलिया, थ्रम्बोसायटोपेनिया, डेंग्यू, आयटीपी, थॅलेसेमिया, यकृताचे आजार यासारख्या आजारांना बाधीत असलेल्या व्यक्तींना किडनीचे विकार असणार्या व्यक्तींना रक्ताची गरज भासते. रक्तदान करणार्या व्यक्तीचे रक्तदान करतेवेळी रक्तदाब, नाडी परिक्षण, हिमोग्लोबीन आदींची तपासणी केली जाते. त्याचबरोबर एचआयव्ही, कावीळ अशा 13 संसर्गजन्य आजारांच्या चाचण्या मोफत केल्या जातात. रक्तदान केल्यामुळे व्यक्ती दीर्घायुषी होते. हदयविकाराचा धोका कमी होतो. महत्वाचे म्हणजे आपल्या रक्तदानामुळे एखाद्याला जीवन दान मिळाल्याचे समाधान मिळते. रक्तदानादिवशी मळाई गु्रप रक्तदात्या व्यक्तींना आरोग्य वर्धक अल्पोपहाराची (सुकामेवा) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आपली सामाजिक बांधिलकी लक्षात घेवून 500 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला आहे. आपण सर्वांनी घेतलेल्या सामाजिक उपक्रमास जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून राष्ट्रीय उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन मळाई ग्रुपचे अध्यक्ष, शेतीमित्र अशोकराव थोरात (भाऊ) यांनी केले आहे.