मुलाचे नाव दाऊद वा याकूब ठेऊ नकोस, इरफान पठाणला चाहत्याचा सल्ला
नवी दिल्ली, दि. 28 - अभिनेता सैफ अली खान व करीना कपुर यांच्या मुलाचे नाव तैमुर ठेवल्यानंतर सोशल मीडियावर उमटलेल्या नाकारात्मक प्रतिक्रियेच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटपटू इरफान पठाणला ट्विटरवरील चाहत्यांनी मुलाचे नाव दाऊद वा याकूब ठेऊ नकोस असा सल्ला दिला आहे. इरफान पठाण व अभिनेत्री, मॉडेल सबा पठाणला नुकताच एक मुलगा झाला. त्यानंतर त्याने याबाबतची माहिती देणारे ट्विट केले होते. त्यावर त्यांच्या चाहत्याने ’मुलगा झाल्याबद्दल शुभेच्छा, पण त्याचं नाव दाऊद किंवा याकूब ठेवू नका, हे जग हास्यास्पद आहे’,असा सल्ला देणारे ट्विट केले होते. आपल्या चाहत्याच्या ट्विटवर इरफाननेही चोख उत्तर दिले. नाव काहीही ठेवले तरी तो आजोंबाप्रमाणे व वडिलांप्रमाणे देशाचे नाव मोठे करणार आहे, असे ट्विट इरफानने केले.