Breaking News

शस्त्रास्त्रांची खरेदी करणा-या देशांच्या यादीत भारत दुस-या क्रमांकावर

वॉशिंग्टन, दि. 28 - मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांची खरेदी करणा-या देशांच्या यादीत भारत दुस-या क्रमांकावर असून सौदी अरेबिया अव्वल  क्रमांकावर आहे. अमेरिकन काँग्रेशनल रिसर्च सर्व्हिसकडून याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला असून ‘कन्वेंशनल आर्म्स ट्रान्सफर टू डेव्हलपिंग नेशन्स  2008-2015’ या नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार 2008 ते 2015 दरम्यान 34 अब्ज डॉलरचा शस्त्रास्त्र साठा खरेदी केला असून सौदी अरेबियाने 93.5 अब्ज  डॉलरचा शस्त्रास्त्र साठा खरेदी केला.
2008 ते 2015च्या कालावधीत सौदी अरेबियाने 93.5 अब्ज डॉलर इतक्या किंमतीचे संरक्षण करार केले. तर याबाबतीत अन्य देशांना मागे टाकत भारत दुस-या  क्रमांकावर आहे. त्याने 34 अब्ज डॉलर इतक्या किंमतीचे संरक्षण करार केले, असे या अहवालात म्हटले आहे. शिवाय संरक्षण क्षेत्रातील स्वयंसिद्धतेसाठी  भारताकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहितीही दिली आहे.