अग्नी-5 ची चाचणी कोणत्याही देशाविरोधात नाही - परराष्ट्र मंत्रालय
नवी दिल्ली, दि. 28 - अग्नी-5 क्षेपणास्त्राच्या चाचणी ही कोणत्याही देशाविरोधात केली नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी स्पष्ट केले.भारताने आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करुन अग्नी-5 ची चाचणी केली आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन अन्य देशांनीही करावे, अशी अपेक्षा स्वरुप यांनी व्यक्त केले. भारताचे सामर्थ्य हे कोणत्याही एका देशाला लक्ष्य करण्यासाठी वाढवण्यात आलेले नाही, असे त्यांनी नमूद केले.
भारताने अग्नी-5 क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याची माहिती मिळाली आहे. भारत अण्वस्त्र वाहून नेणारी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करु शकतो का, याबद्दलचे नियम संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने स्पष्ट केले आहेत, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे हुआ चुनयिंग यांनी अग्नी-5 च्या चाचणीसंदर्भात प्रतिक्रिया दिली. चीनच्या या प्रतिक्रियेला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रत्युत्तर दिले आहे.