चार वर्षांनंतर सिरियाच्या लष्कराने घेतला अलेप्पोवर ताबा
अलेप्पो, दि. 23 - सिरियाच्या लष्कराला चार वर्षांनंतर अलेप्पो शहरावर ताबा मिळवण्यात यश आले आहे. 2011 पासून सुरू असलेल्या गृहयुद्धातील लष्कराला मिळालेला मोठा विजय असल्याचे मानले जात आहे.
शहराला बंडखोरांपासून मुक्त करण्यात आल्याची घोषणा सियाच्या लष्कराकडून एका परिपत्रकाद्वारे करण्यात आली. गेल्या सहा वर्षांपासून अलेप्पोवर ताबा मिळवून बसलेल्या बंडखोरांना लागलेला हा मोठा धक्का आहे. या आंदोलनात आजवर 3 लाख 10 हजार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अलेप्पोबरोबरच आणखी चार मोठ्या शहरांवर सिरियाच्या लष्कराने ताबा मिळवला आहे. यामध्ये होम्स, हामा, दमास्कम आणि लताकिया या शहरांचा समावेश आहे. राष्ट्राध्यक्ष बशर अल असद आणि त्यांच्या सहकार्यांसाठी हा मोठा विजय असल्याचे मानले जात आहे. तर त्यांच्या विरोधातील सौदी अरेबिया, कतार आणि काही पश्चिमात्य देशांसाठी हा मोठा पराभव ठरला आहे.