Breaking News

अन्यथा भीक मागो आंदोलन-भारिप बहुजन महासंघ

परळी वैजनाथ, दि. 23 - परळी येथील औष्णिक विद्युत केेंद्र संच क्रमांक 4 व 5 लवकरात लवकर सुरु करावा अन्यथा भारतीय प्रजासत्तक दिनी 26 जानेवारी 2016 रोजी औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मा.खा.ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली  भीक मागो आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारिप बहुजन महासंघाच्या वतीने परळी वैजनाथ शहराध्यक्ष संजय गवळी व युवा तालुकाध्यक्ष राहुल व्हावळे यांनी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता श्री चौधरी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षापासुन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच बंद होते कांही दिवसापुर्वी यातील कांही संच सुरु करण्यात आले असुन संच क्रमांक 4 व 5 अद्यापही बंद अवस्थेत आहेत. यामुळे परळी शहरातील कामगार तसेच सुशिक्षीत बेरोजगार, छोटे मोठे कंत्राटदार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करावा हा गंभीर प्रश्‍न निर्माण झाल्याने त्यांच्यावर आत्महत्या करण्याच्या परिस्थिती निर्माण झाली आहे.
परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता चौधरी यांना दि.22 डिसेंबर रोजी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात पुढे म्हटले आहे की, यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात झाला असल्यामुळे परळी शहर व तालुक्यातील सर्व नद्या, नाले, तळे, विहिरी, तुडूंब भरली असल्याने पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला असुन तरीही अद्यापही औष्णिक विद्युत के्ंरदाचा संच क्र.4 व 5 सुरु करण्यात आला नाही. तो त्वरीत सुरु करावा व भुमिपुत्रांचे होणारे स्थांलतर व त्यांची बेकारी उपासमारी, आत्महत्या करण्याच्या परिस्थिती दूर करुन त्यांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, छोटे मोठ्या कंत्राटदारांच्या हाताला काम मिळावे. यासाठी उर्वरित संच क्र.4 व 5 त्वरीत सुरु करावा अन्यथा भारिप बहुजन महासंघाच्या वतीने औष्णिक विद्युत केंद्राच्या कार्यालया समोर भीक मांगो आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारिप बहुजन महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.
सदरील निवेदनाच्या प्रती मा.मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ना.धनंजय मुंडे, बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांना निवेदन पाठविण्यात आली आहेत.
यावेळी निवेदन देतांना भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष संजय गवळी, युवा तालुकाध्यक्ष राहुल व्हावळे यांच्यासह  राजेश सरवदे, विनोद कांबळे, अण्णा किराणे,बंडु सावंत, सचिन तरकसे, बुवाजी आदोडे, युवराज गवळी, मयुर व्हावळे, प्रेम सरवदे, यशपाल बचाटे, भैय्या गवळी, अविनाश गवळी, सचिन सरवदे, गणेश हनवते हे उपस्थित होते.