सातार्यात किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
सातारा, दि. 27 (प्रतिनिधी) : किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे दि. 28 व 29 डिसेंबर रोजी सातारा येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती अनुभव फिल्म क्लबचे अध्यक्ष शिरीष चिटणीस व महोत्सवाचे संचालक वीरेंद्र चित्राव यांनी दिली.
अनुभव फिल्म क्लब सातारा, बँक ऑफ महाराष्ट्र व लायन्स क्लब ऑफ सातारा गेंडामाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पंधरा देशातील सुमारे चाळीस लघुपट आणि अनुबोधपट हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले चित्रपट दाखवले जाणार आहे. या महोत्सवात छायाचित्रात प्रदर्शन व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यशाळा तसेच वसुंधरा मित्र पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन बुधवार, दि. 28 रोजी सकाळी 11 वाजता येथील न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथील सभागृहात होणार असून उद्घाटक म्हणून माजी संचालक बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे विभाग प्रमुख पर्यावरणशास्त्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर प्रा. डॉ. जय सामंत उपस्थित राहणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक अहिलाजी थोरात, उपप्रांतपाल एम. जे. एफ. ला. वासुदेव कलघटगी सातारा, नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अॅड. दत्ता बनकर, न्यू इंग्लिश स्कूलच्या शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, लायन्स क्लब ऑफ सातारा गेंडामाळचे अध्यक्ष विनायक भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
याच दिवशी दीपलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे सकाळी 9 वाजता छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटक निसर्ग छायाचित्रकार व पर्यावरण प्रेमी डॉ. जितेंद्र कात्रे यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी प्रमोद यादव सातारा उपस्थित राहणार आहेत. 28 डिसेंबर रोजी 11 ते 3 यावेळेत न्यू इंग्लिश स्कूल येथे पर्यावरण व दर्जेदार आंतरराष्ट्रीय लघुपट दाखवले जाणार आहेत.
29 डिसेंबर रोजी लोकमंगल हायस्कूल एमआयडीसी सातारा येथे 11 ते 4 यावेळेत पर्यावरण, वन्यजीवन, ऊर्जा, हवा व पाणी या विषयावर चित्रपट दाखवले जाणार आहेत. या चित्रपट महोत्सवाचा समारोप 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे होणार असून यावेळी ’वसुंधरा मित्र पुरस्काराचे वितरण संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांना केले जाणार आहे. यावेळी ’संत साहित्यातील पर्यावरण विचार’ या विषयावर डॉ. रामचंद्र देखणे यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील, नाबार्ड डिस्ट्रीक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर सुबोध अभ्यंकर सातारा अध्यक्षस्थांनी असणार आहेत. यावेळी अहिलाजी थोरात, डॉ. संदीप श्रोत्री, विरेंद्र चित्राव, विनायक भोसले, अन्वर शेख, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी समस्त सातारकर व पर्यावरण प्रेमींनी या महोत्सवाचा भरभरुन आनंद घेण्याचे आवाहन गिरीष कुलकर्णी, राजभूषण सहस्त्रबुध्दे व अनुभव फिल्म क्लबचे अध्यक्ष शिरीष चिटणीस व संयोजन समितीने केले आहे.