किसन वीर यांचा आज स्मृतिदिन
सातारा, दि. 27 (प्रतिनिधी) : भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर यांच्या 37 व्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार, दि. 27 रोजी सकाळी साडेनऊ वाजता कारखाना कार्यस्थळावर अभिवादन कार्यक्रम होणार आहे.
कारखाना कार्यस्थळावरील सामान्य प्रशासन विभागातील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार्या या कार्यक्रमासाठी किसन वीर महाविद्यालयाचे प्राध्यापक रमेश डुबल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकरी, हितचिंतक, कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव व संचालक मंडळाने केले आहे.