Breaking News

हप्ता देण्याची मागणी करत हॉटेल कामगारांना मारहाण

पुणे, दि. 22 - दरमहा 50 हजार रुपयांचा हप्ता देण्याची मागणी करत तिघा जणांनी हॉटेलच्या कामगारांना बेदम मारहाण केली. तसेच हॉटेलमधील साहित्याची  तोडफोड केली. ही घटना दुपारी साडेतीन आणि सोमवारी (दि.19) साडेसातच्या सुमारास चिंचवड येथे घडली. 
सोमनाथ काळभोर (रा. एमआयडीसी, चिंचवड) याच्यासह त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजू शेट्टी यांनी निगडी  पोलीस ठण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड, एमआयडीसी येथे फिर्यादी शेट्टी यांचे गायत्री या नावाने हॉटेल आहे. शनिवारी आरोपी त्यांच्या हॉटेलमध्ये आले.  हॉटेलमधील कामगार मनुश नारायण देवाडिगा, महेश पाईकराव, सचिन राठोड, किरण देवाडिया आणि सुरेंद्र यांना शिवीगाळ केली. ’’तुझ्या मालकाला बोलावून  घे, मला दरमहा 50 हजार रुपये हप्ता दे नाहीतर हॉटेल चालू देणार नाही,’’ असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच हॉटेलमधील खुर्च्या, ग्लास आणि  टेबलची तोडफोड केली.
मनुश नारायण देवाडिगा, महेश पाईकराव, सचिन राठोड यांना पळवून नेले. चिंचवड येथील श्री दत्त फॅब्रिकेटर्स या कंपनीत त्यांना डांबून ठेवले आणि लाकडी  दांडक्याने बेदम मारहाण केली. निगडी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एम. साबळे तपास करत आहेत.