Breaking News

मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेची शहीद सौरभ फराटे यांच्या कुटुंबीयांस 2 लाखाची मदत

पुणे, दि. 22 - मुस्लिम सहकारी बँकेच्या वतीने देशरक्षणासाठी शहीद झालेल्या फुरसुंगी येथील सौरभ फराटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन 2 लाख रुपयांची  रक्कम डिमांड ड्राफ्टद्वारे मदत म्हणून देण्यात आली.
मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष पी.ए. इनामदार यांनी संचालक सहकार्‍यांसमवेत फराटे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले आणि मदतीचा डिमांड ड्राफ्ट  सुपूर्त केला. यावेळी बँकेच्या उपाध्यक्ष मुमताज सय्यद, संचालक इम्तियाझ शिकिलगर, लुकमान खान, मुनावर शेख, अझीम गुडाखूवाला, तबस्सुम इनामदार,  तसेच सामाजिक कार्यकर्ते श्यामराव कुतवळ आदी उपस्थित होते.
‘शहीद सौरभ फराटे यांचे बलिदान देश विसरणार नाही. देशबांधव या नात्याने आमचे कर्तव्य म्हणून त्यांच्या कुटुंबियांना आम्ही कोणतीही अडचण येऊ देणार  नाही. मुस्लिम कॉ ऑपरेटिव्ह बँकेने आर्थिक मदत केली आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलात स्व. फराटे यांच्या  मुलांच्या सर्व शिक्षणाची जबाबदारीही संस्थेने घेतली आहे, अशा शब्दात पी.ए. इनामदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.