Breaking News

फटाके न वाजवणार्‍या मुलांना वृत्तपत्र विक्रेत्यांकडून वह्यांचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी) । 03 - नगर-पुणे रोडवरील विनायकनगरमधील वृत्तपत्र विक्रेते चेतन गुंदेचा यांनी दिवाळीनिमित्त प्रदूषण मुक्तसाठी फटाके न फोडणार्या मुलांना वह्यांचे मोफत वाटप केले. गुंदेचा यांनी यासाठी आवाहन केले होते. विनायकनगर मित्र मंडळातील कार्यकर्त्यांनी त्याला प्रतिसाद देत फटाके न वाजविण्याचा संकल्प करत तशी कृती केली. या उपक्रमाची दखल घेत गुंदेचा यांनी स्वखर्चाने वह्या आणून विनायक नगरमधील गणपती मंदिरासमोर डॉ. आशिष बोरकर, प्रवीण कुलकर्णी, नीलेश कुकडे, शैलेष कुकडे, डॉ. अभय मुथ्था, विजय गुंदेचा , विवेक शिंदे, शुभम कारखिले यांच्या हस्ते वह्यांचे वाटप केले.
 या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे ही संकल्पना पुढे चालविण्याचा संकल्प गुंदेचा यांनी यावेळी केला. वृत्तपत्र विक्रेता गुंदेचा यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. प्रवीण कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. माजी अध्यक्ष विवेक शिंदे यांनी आभार मानले.