Breaking News

ओएनजीसीतला नांदेडचा इंजिनिअर 15 दिवसांपासून बेपत्ता

नांदेड, दि. 03 - मुंबईजवळच्या ओएनजीसीतला 25 वर्षीय इंजिनिअर तरुण गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता आहे. मूळ नांदेडच्या असलेल्या शिवकुमार लष्करेचा थांगपत्ता लागलेला नाही.
दिवाळीत घरी येतो असे सांगणारा शिवकुमार 15 दिवसांपूर्वी अचानक भर समुद्रातील ओएनजीसीच्या रिगवरुन बेपत्ता झाला. ओएनजीसीतर्फे पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी शोध घेतला, ओएनजीसीने शोध घेतला, पोलीस दलात फौजदार असलेल्या शिवकुमारच्या वडिलांनीही त्याचा शोध घेतला, मात्र शिवकुमार सापडलेला नाही. अतिशय संवेदनशील परिसर असलेल्या या भागात अपहरण होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे शिवकुमार नेमका कुठे गेला, हा प्रश्‍न सर्वांना पडला आहे.