बाजार समितीला यशोशिखरावर नेऊ - संतोष म्हस्के
अनेक खाजगी सावकारांनी शेतकर्यांच्या अशिक्षितपणेचा फायदा घेऊन त्यांच्या जमीनीवर नांव लावून घेतले आहे. स्विस बँकेत अनेक भारतीयांचा काळापैसा जमा असून, यापेक्षा जास्त काळापैसा खाजगी सावकारांकडे स्थावर मालमत्तेच्या माध्यमातून दडून आहे. खाजगी सावकाराच्याजाचास कंटाळून अनेक शेतकर्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काळापैसा बाहेर येण्यासाठी चलनातून 500 व 1000 रु. च्या नोटा रद्द केल्या नंतर काळ्या पैश्यांची गुंतवणूक जागेच्या व्यवहारामध्ये चालू आहे. बेहिशोबी स्थावर मालमत्ता बाळगणार्यांना लगाम लावण्यासाठी व जागा खरेदीची मर्यादा घालून देण्यासाठी अर्बन लॅण्ड सिलिंग कायदा लागू करण्याची व आधार कार्डप्रमाणे नागरिकांना नॅशनल प्रॉपर्टीकार्ड देण्याची मागणी केली जाणार आहे. नॅशनल प्रॉपर्टीकार्डद्वारे नागरिकांच्या साधन संपत्तीची नोंद होणार आहे. याव्यतिरिक्त गैरमार्गाने कमवलेली साधन संपत्ती उघड होवून शासनाला ती जप्त करता येणार असून, यामाध्यमातून देशातील गरिब व श्रीमंताची दरी कमी होणार असल्याचे अॅड.कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. आंदोलनात शोषित शेतकर्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आंदोलनात जनआंदोलनाचे अध्यक्ष यमानाजी म्हस्के, कायदे सल्लागार अॅड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, संतोष पंधारे, ताराबाई वाळेकर, इंदूबाई चौधरी, विष्णू वाघुळे, भगवान घोलप, राहूल घोलप, बबन भोसले, बबन कापसे, गोरख कापसे आदि सहभागी होणार आहे.
