Breaking News

श्रेय लाटण्यासाठी दोन्ही गटाचे नगरसेवक हमरीतुमरीवर

शहर व उपनगरातील रस्त्यावरील बुजविलेल्या खड्ड्याचे

अहमदनगर, दि. 20 - आचासंहीतेच्या पार्श्‍वभुमीवर स्थगीत झालेली मनपाची सभा शनिवारी सकाळी महापौर सुरेखा कदम यांच्या अध्यक्षतेखाली सुरु पडली.  यावेळी नियमबाह्य धार्मिकस्थळे पाडण्या बाबातचा निर्णय, अग्निशामक दलाच्या नादुरुस्त गाड्या, फेज 2 च्या कामाबाबातची प्रगती व बोगस कामांचे प्रस्ताव तसेच  आदा केलेली बिले या विषयावर सभा रेंगाळली, सकळी सुरु झालेली सभा सायंकाळी 5.30 च्या सुमारास संपली. दरम्यान, रस्त्यावरील खड्डे बुझविण्याचे श्रेय  लाटण्यासाठी सभागृहात सत्ताधारी व विरोधी नगरसेवक समोरा समोर येवुन आक्रमक झाले होते.
मनपा सभागृहात शनिवारी तब्बल दोन सभा झाल्या. दोन्ही सभेत विषय पत्रिकेवरील विषय सोडुनच चर्चा झाली. या सभेस उपमहापौर श्रीपात छिंदम,  मनपा  आयुक्त गावडे, उपायुक्त चारठणकर, नगरसचिव व सर्व विभागाचे अधिकारी आणि अभियंता उपस्थित होते.
सभा सुरु होताच शहरातील नियमबाह्य धार्मिक स्थळे पाटण्याचे विषयावर चर्चा झाली त्यानंतर कैलास गिरवले यांनी शहरातील अनेक बोगस कामांच्या प्रस्ताव व  बोगस बिलासंदर्भात यादीच सभागृहातसोर ठेवली. यावेळी सर्वच नगरसेवक अ्राक्रम झाले.
अनुदान घेऊन सौचायल न बांधणार्‍यांवर फौजदारी तसेच बोगस प्रस्ताव करणार्‍यां अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.