Breaking News

मौलाना आझाद जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा

अहमदनगर, दि. 20 - मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त मखदूम एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटीतर्फे कौमी एकता सप्ताह मध्ये अहमदनगर  उर्दू हायस्कूल मिसगर लायब्ररी येथे मौलानांच्या जीवनावर दोन गटात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये 5 वी ते 7 वी पहिला गट व 8 वी ते 10 वी दुसरा गट होता. या दोन्ही गटात मिळून 450 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. ज्यामध्ये  पहिल्या गटात प्रथम अन्सारी अरुजा फुरकान, द्वितीय शेख अफशा ईमरान, तृतीय शेख अफरोज फिरोज यांना तर दुसर्या गटात प्रथम-सुमैय्या समीर, द्वितीय-  लायबा कफील तर तृतीय -आमरीन अयुब यांनी पारितोषिक पटकावली. विजेत्यांना शालेय उपयोगी वस्तू बक्षिस म्हणून देण्यात आल्या. याकार्यक्रमास प्रमुख  पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते तन्वीर चष्मावाला, शेख आदिल रियाज, आबीद दुलेखान व निशात आफरीन उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य मुशताक सर  होते.सूत्रसंचालन सय्यद आसिफ यांनी केले. प्रास्तविक नजमुस्सहर बाजी यांनी केले तर आभार नगमा सुलताना यांनी मानले.