Breaking News

क्रांती शूगरमुळे शेतकर्‍यांचे भविष्य उज्वल: हजारे

। साखर कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ अण्णा हजारे यांच्याहस्ते संपन्न । मान्यवरांची उपस्थिती

 पारनेर (प्रतिनिधी)। 05 - क्रांती शूगर कारखान्यामुळे पारनेर तालुक्यातील शेतकर्‍यांचे भविष्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा  हजारे  यांनी केले. पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील युनिट ऑफ श्री क्रांती शूगर या साखर कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ हजारे यांच्या हस्ते  गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला, या वेळी हज़ारे बोलत होते. माजी खासदार अशोकराव मोहोळ अध्यक्षस्थानी होते. हजारे यांनी पुढे सांगितले की,  महाराष्ट्रात सहकार चळवळ व सहकार क्षेत्रात अडचणी आल्या तरी त्यावर मात करून श्री संत तुकाराम साखर कारखान्याचे प्रमुख माजी खासदार नानासाहेब  नवले यांनी क्रांती शूगरने पारनेर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या। उसाला योग्य भाव कामगारांना बोनस देऊन उपकृत केले आहे. पारनेर हा दुष्काळी भाग असल्याने  शेतकरी व कामगारांना मोठा संघर्ष करावा लागला आहे. क्रांती शूगरच्या माध्यमातून खासदार विदूर नवले व सहकार्‍यांनी एकत्र येऊन पारनेरला न्याय देण्याचे  काम केले आहे. संत तुकाराम साखर कारखाना माजी खासदार नानासाहेब नवले यांनी अत्यंत कष्टाने उभारून आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी पारनेर साखर  कारखाना सुरू केल्याने त्यांच्याकडून शेतकरी व कामगार हिताचे निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा हजारे यांनी व्यक्त केली. या वेळी माजी खासदार नानासाहेब  नवले म्हणाले, आम्ही शेतकर्‍यांच्या उसाला चांगला भाव देऊ. पारनेरकरांनीही कारखान्याला ऊस द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. निघोज नागरी पतसंस्थेचे  चेअरमन व निघोज परिवाराचे मार्गदर्शक बाबासाहेब कवाद व जि.प. सदस्य विश्‍वनाथ कोरडे यांनी पारनेर कारखाना सुरू झाल्याने परिसरातील अर्थकारण  बदलणार असल्याचे सांगितले. कार्यकारी संचालक साहेबराव पठारे यांनी कारखान्याच्या वतीने पुढील उपाययोजनांविषयी माहिती दिली. या वेळी शिरूरचे माज़ी  आमदार पोपटराव गावडे, अध्यक्ष ज्ञानेश नवले, बाळासाहेब नवले, सुमीत नवले, मा.आ.ज्ञानेश्‍वर लांडगे, कन्हैया दूध उद्योग समूहाचे चालक शांताराम लंके,जिल्हा  परिषद सदस्य विश्‍वनाथ कोरडे, अँड़पांडुरंग गायकवाड, मा.जि.प. अध्यक्ष रमेशचंद्र ढमाले,निघोज नागरी पतसंस्थेचे व्हाईस
चेअरमन नामदेव थोरात, संचालक बहिरू कळसकर, नानापाटील लंके ,माजी पंचायत समिती सदस्य सुभाष बेलोटे,नीलेश नवले, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र  सुर्वे, सरव्यवस्थापक जगन्नाथ जायकर आदी उपस्थित होते.संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक साहेबराव पठारे यांनी प्रस्ताविक  करून सूत्रसंचालन केले. कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश नवले यांनी आभार मानले.