Breaking News

जिल्ह्यात रब्बीची 42 टक्के पेरणी

अहमदनगर, दि. 05 - जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी आतापर्यंत 42 टक्के पेरणी झाली असून पेरणीचे क्षेत्र 2 लाख 73 हजारांच्या जवळपास आहे. यात सर्वाधिक  पेरणी ज्वारी पिकाची 1 लाख 95 हजार हेक्टरवर झालेली आहे. गव्हाच्या पिकाची पेरणी सुरू झाली असून हरभरा पिकांची 20 टक्क्यांच्या जवळपास पेरणी झाली  आहे. यंदा चांगल्या पावसामुळे जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी आशादायक चित्र आहे. यंदा पाऊस चांगला झाला असला तरी त्याचा फायदा ऊस पिकाला होणार  नाही. मात्र, यंदा दिवाळीनंतर ऊस लागवडीला वेग येणार आहे. नगर जिल्हा हा खर्या अर्थाने रब्बी हंमागाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ज्वारी हे हंगामातील  मुख्य पीक असून उत्तर जिल्ह्यात गहू, हरभरा आणि कांदा ही पिके घेतली जातात. अद्याप कडाक्याची थंडी नसल्याने गव्हाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्हा  परिषदेच्या कृषी विभागाने हंगामाची तयारी पूर्ण केली असून आवश्यक असणारे खते, बियाणे आणि किटकनाशकांची मागणी नोंदवून त्याचा तालुकानिहाय पुरवठा  करण्यात येत आहे.