Breaking News

भाजपच्या परिवर्तन यात्रेत मोदी, शाह यांच्यासह सहा नेते होणार सहभागी

नवी दिल्ली, दि. 02 - उत्तर प्रदेशमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 5 नोव्हेंबरपासून भाजपची परिवर्तन यात्रा सुरू होत आहे. या रथयात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, याशिवाय केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री कलराज मिश्र, केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती व उ.प्र. प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य सहभागी होणार आहेत. परिवर्तन यात्रेची सुरुवात 5 नोव्हेंबर रोजी सहारनपूर येथून होईल. त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी झाशी, 8 नोव्हेंबर रोजी सोनभद्र व 9 नोव्हेंबर रोजी बलिया येथे यात्रा असणार आहे.