Breaking News

पाकिस्तानला गंभीर परिणाम भोगावे लागतील - जेटलींचा इशारा

नवी दिल्ली, दि. 02 - आतापर्यंत भारताने खूप काही सहन केले आहे. मात्र आता पाकिस्तानला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिला आहे. पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.
जेटली म्हणाले की, पाकिस्तानच्या 14 चौक्या उद्ध्वस्त करणे हा पाकिस्तानला संदेश आहे की, भारतीयांची हत्या केल्यास त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. पाकिस्तान भारताच्या विरोधात त्यांच्या भूमीचा वापर करूदेत आहे. पाकिस्तानकडून दहशतवादी भारतात येत आहेत. उरी, पठाणकोटमध्ये झालेले दहशतवादी हल्ले हे त्याचे पुरावे आहेत. आम्ही आतापर्यंत शांत राहून खूप काही सहन केले आहे. मात्र आता पुरे झाले. भाजप सरकारची धोरणे वेगळी आहेत. पाकिस्तानला हे समजले पाहिजे की, आता काळ बदलला आहे, असेही जेटली म्हणाले.