Breaking News

आयसीसी क्रमवारीत बांगलादेशच्या मेहंदी हसनची गरूडझेप

ढाका, दि. 03 - यजमान बांगलादेशने बलाढ्य इंग्लंडवर कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करणारा  बांगलादेशचा फिरकीपटू मेहंदी हसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या जागतिक क्रमवारीत 28 स्थानांची झेप घेतली आहे. कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत  मेहंदी हसनने 33वे स्थान पटकावले आहे. केवळ दोन कसोटी सामने खेळून त्याने ही कामगिरी केली आहे. या यादीतील मेहंदी हसन हा बांगलादेशचा दुसरा  सर्वोत्तम गोलंदाज ठरला आहे. अष्टपैलू शाकीब अल हसन यादीत 15व्या स्थानी कायम आहे.
या व्यतिरिक्त, संघांच्या क्रमवारीत बांगलादेश नवव्या स्थानी कायम आहे, पण या विजयामुळे आणि मालिका बरोबरीत सुटल्यामुळे बांगलादेशला 8 गुणाला मिळाले  असून त्यांचे 65 गुण झाले आहेत. त्यामुळे कसोटी क्रमावारीत बांगलादेश आणि विंडिजमध्ये केवळ दोन गुणांचे अंतर राहिले आहे.