Breaking News

64 व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ जाहीर !

जोधपूर, दि. 03 - जोधपूर येथील उमेद स्टेडियम येथे दि. 5 नोव्हे. ते 8 नोव्हे. 2016 या कालावधीत होणार्‍या 64 व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी  स्पर्धेकरिता महाराष्ट्राने आज आपला संघ जाहीर केला.पुण्याच्या विकास काळे च्या गळ्यात संघाच्या नेतेपदाची माळ टाकण्यात आली. राज्य संघटनेचे सरचिटणीस  आस्वाद पाटील यांनी एका पत्राद्वारे हा संघ प्रसार माध्यमांसाठी जाहीर केला. हा संघ दि. 4नोव्हे.रोजी दुपारी बांद्रा टर्मिनस येथून जोधपुरला स्पर्धेकरिता रवाना  होईल.महाराष्ट्राचा संघ खालील प्रमाणे.
1)विकास काळे  (पुणे),2)काशिलिंग आडके,सांगली 3)मंगेश भगत,पुणे 4) सुलतान डांगे,नंदुरबार 5) गिरीश ईरनक,ठाणे 6)सुनील लांडे,पुणे 7) आनंद  पाटील,कोल्हापूर 8) अरिफ सय्यद,मुंबई उपनगर  9) निलेश साळुंखे,ठाणे 10) निलेश शिंदे,मुंबई उपनगर  11)सचिन शिंगाडे,सांगली 12)मयूर शिवतरकर,मुंबई  शहर. संघप्रशिक्षक:डॉ.माणिक राठोड (औरंगाबाद) संघव्यवस्थापक:श्री .सुधाकर घाग (मुंबई उपनगर).