Breaking News

देशातील 10 टक्के ‘एटीएम’मध्ये मिळणार 100 रुपयांच्या नोटा ?

मुंबई, दि. 03 - देशातील सामान्य जनतेची 100 रुपयांच्या नोटांची गरज पूर्ण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून महत्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे.  एका नव्या पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत देशातील 10 टक्के ‘एटीएम’मधून फक्त 100 रुपयांच्या नोटा मिळणार आहेत.
देशातील सामान्य जनतेची 100 रुपयांची गरज भागवण्याचा या प्रकल्पातून प्रयत्न केला जाणार आहे. देशातील बँकांना आपल्या एटीएम मशिन्समध्ये 100  रुपयांच्या नोटा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले असल्याचे रिझर्व्ह बँकेकडून जारी केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. देशातील बँकांना 10 टक्के  एटीएम मशिन्स निवडण्याचा सल्ला रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आला. एटीएम मशिन्समध्ये कमी मूल्याच्या नोटा उपलब्ध करून देण्याच्या बँकेच्या योजनेचा रिझर्व्ह  बँकेकडून अलीकडेच आढावा घेण्यात आला.