Breaking News

इल्युमिनेशन’द्वारे साजरा करण्यात आला आयआयटी खरगपूरमध्ये दिपोत्सव

कोलकाता, दि. 03 - विविध तर्‍हेचे फटाके फोडून देशभरात दिवाळी साजरी केली जाते. त्यामुळेच वातावरणात ध्वनीप्रदूषण आणि वायुप्रदूषात वाढ  होते. मात्र भारतातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी संस्था म्हणजे आयआयटी खरगपूर. येथे मात्र दिपावलीचा सण अभिनव पद्धतीने साजरा केला  जातो. यंदाच्या वर्षीही आयआयटी खरगपूरमधील विद्यार्थ्यांनी पर्यावरणस्नेही आणि भारतजन्य दिवाळी साजरी केली. त्याला खश्रर्श्रीाळपरींळेप (इल्युमिनेशन)  किंवा खश्रर्श्री  (इलू) असे संबोधले जाते. गेल्या चार दशकांपासून आयआयटी खरगपूर येथे ही परंपरा सुरू आहे. आयआयटीमधील विद्यार्थी अवाढव्य बांबूंची  रचना तयार करुन, त्यावर दिवे ठेवतात. या संरचना तयार करण्यासाठी लागणारा कच्चा मालदेखील स्थानिक विक्रेत्यांकडून खरेदी करण्यात येतो. तसेच दिव्यातून  धूर कमी यावा, याकरिता दिव्यांमध्ये लागणार्‍या तेलावरही विविध प्रक्रिया केलेल्या असतात. तसेच त्यांच्या या उपक्रमामुळे दिवाळीनंतर पर्यावरणाला हानी  पोहोचवणारा कोणताही कचरा तयार होत नाही.
याशिवाय रंग, प्रकाश आणि विद्यार्थ्यांची सर्जनशीलता यांच्या संयोगातून तयार झालेली रांगोळीही आयआयटी खरगपूरचे एक वैशिष्ट आहे. कॅम्पसमधील सर्व  वसतिगृहांची सभागृहे कला आणि तंत्रज्ञानाच्या अभिनव संगमातून एक सुरेख रांगोळी तयार करतात. त्याकरिता ते नैसर्गिक, स्वदेशी बनावटीचे आणि  पर्यावरणपूरक रंगांचा वापर करतात. त्यांचा हा उपक्रम निश्‍चितच प्रेरणादायी आहे.
आयआयटी खरगपूर कॅम्पसमधील हजारो विद्यार्थी या सोहळ्यात आनंदाने सहभागी होतात. घरापासून दूर राहत असलेले हे विद्यार्थी आपल्या या सहकार्‍यांसोबत  वेगळ्या पद्धतीची दिवाळी साजरी करुन नवनव्या आठवणी निर्माण करतात. इल्युमिनेशन या उपक्रमामधील दिवे जरी काही मिनिटांमध्ये विझत असतील, तरी  त्याद्वारे तयार झालेल्या आठवणी मात्र विद्यार्थ्यांच्या मनात कायमच्या कोरल्या जातात.