Breaking News

दिल्ली-आग्रा महामार्गावर धुक्यामुळे 20 गाड्यांचे अपघात; अनेक जखमी

नवी दिल्ली, दि. 03 - दिवाळीनंतर राजधानी दिल्लीसह नजीकच्या भागात पसरलेल्या दाट धुक्यामुळे दिल्ली ते आग्रा दरम्यान असलेल्या यमुना द्रुतगती  महामार्गावर आज 20 गाड्या एकमेकांवर धडकल्या असून अनेक जण जखमी झाले आहेत.
दिल्लीत फटाक्यांच्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात धुक्याचे साम्राज्य आहे. फटाक्यांमुळे हवेच्या प्रदूषरात वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरात व  आसपासच्या भागात धुक्यामुळे समोरील काही अंतरावरील दिसणे अवघड झाले होते. या अपघातात अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून,  जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामहामार्गावर दरवर्षी याच कारणामुळे अपघात होत असतात.
तज्ञांच्या मते तापमान व हवेत कोणत्याही प्रकारची गती नसणे हे प्रदूषणाचा स्तर वाढण्याचे प्रमुख कारण आहे. सकाळच्या वेळी प्रदूषणाचा सर्वाधिक स्तर  मर्यादेपेक्षा 10 टक्क्यांनी अधिक नोंद केला गेला. जसाजसा दिवस वाढत जातो तसतशी यामध्ये घट होत जाते. या सूक्ष्म कणांची मर्यादा 60 ते 100 मायक्रोग्रॅम  प्रति घनमीटर इतकी आहे.
विज्ञान व पर्यावरण केंद्राच्या अनुमिता रायचौधरी म्हणाल्या की, हवा खूपच शांत व तापमान फारच थंड होत आहे. परिणामी प्रदूषणाचा स्तर वाढतो. थंडीच्या  दिवसात दरवर्षी होते. तीव्रता वेगवेगळी असू  शकते. दिल्ली म्हणजे विषारी वायूने भरलेले शहर झाले आहे.