Breaking News

मढी देवस्थानच्या विकासासाठी प्रयत्नशील : राजळे

पाथर्डी (प्रतिनिधी) । 03 - श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या पुरक विकासाबरोबरच गाव व भाविक केंद्रस्थानी ठेवून सेवाभावी उपक्रमांतर्गत सर्वांगीण विकासाचा विश्‍वस्थ मंडळाचा मानस आहे. र्त्यासाठी कायम प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी दिली.
देवस्थानच्या ईनाम वर्ग जागेत, बहुउद्देशीय सभागृह व काँक्रिट रस्त्याच्या कामास प्रारंभ करताना ते बोलत होते. महंत अशोक महाराज मरकड, पोपट महाराज मरकड, युवानेते बबनतात्या मरकड व विश्‍वस्त याप्रसंगी उपस्थित होते. राजळे म्हणाले, श्रीक्षेत्र मढी देवस्थानचे महात्म्य सर्वदूर असल्याने वर्दळ वर्षभर सुरू आहे. कीर्तन , प्रवचने धार्मिक व शालेय सहली, आरोग्य शिबिरासाठी निवारा कमी पडत आहे. या बहुउद्देशीय सभागृहाच्या वास्तूने सर्व सुविधा एकाच छत्राखाली उपलब्ध होतील. प्रास्ताविक सुधीर मरकड यांनी केले.
मधुकर साळवे यांनी आभार मानले. माजी सरपंच देवीदास मरकड, ज्योती मरकड, अण्णासाहेब मरकड, शिवाजी मरकड, माजी उपसरपंच रवींद्र आरोळे, देवस्थानचे सचिव अप्पासाहेब मरकड, बाबासाहेब मरकड, कार्यकारी अधिकारी अशोक पवार आदींसह ग्रामस्थ व भाविक याप्रसंगी बहुसंख्येने उपस्थित होते.