Breaking News

अपघातात मुत्यूमूखी पडलेल्या शेख खालीक यांचे कुटूंबियास आ.बोंद्रे कडून आर्थीक मदत

बुलडाणा, दि. 04 - धोत्रा नाईक येथील आई वडील वारलेले असतांना माहेरी परीत्यक्तेचे जिवन जगणार्‍या व गावात कोणाचाही आधार नसलेल्या महिलेचा  एकुलता एक पुत्र मोटार सायकलच्या अपघातात मुत्यूमुखी पडण्याची घटना घडून आली. या महिलेचे भाउही परगावी राहतात त्यातच ही आपत्ती आल्याने  मोलमजुरीचे जिवन जगणार्‍या या महिलेला आधार देण्यासाठी चिखली मतदार संघाचे आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी धोत्रा नाईक या गावी जावून सदर महिलेची  सात्वनपर भेट घेतली. या परीस्थतीतून सावरण्यासाठी स्वत: जवळून तातडीचा पाच हजार रूपये निधी मदत म्हणून देण्याबरोबरच या कुटूूंबाला शासनाच्या  आर्थीक सहाय्य निधीतून तातडीने मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही स्पष्ट केले.
धोत्रा नाईक येथील शेख खलीक शेख मन्नान वय 26 वर्ष यांचा दोन दिवसा आगोदर मोटार सायकलचा अपघात होवून मुत्यू झाला. त्यात धोत्रा नाईक  येथीलच अनिल राठोड व आशिष जाधव व इतर गंभीररीत्या जखमी झाले. मतदार संघातील परीत्यक्ता महिलेचा घरातील कमावता एकुलता एक मुलगा मुत्यू  पावल्याने व या अपघातात जखमींचे घरी जावून आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी तातडीने सात्वनपर भेट घेतली. तरूण मुलाच्या मुत्यूनंतर ओढवलेल्या अपत्तीतून  सावरण्यासाठी त्यांनी मृताच्या मातेला 5 हजार रूपये सानुग्रहपर मदत त्यांचे घरी जावून दिली. त्याशिवाय कुटूंबातील एकमेव कमावता व्यक्ती व कुटूंबाचा आधार  गेल्याने शासनाचे आर्थिक सहाय्य योजनेतून मदत मिळवून देण्यासाठी प्रकरण चिखली तहसिल मध्ये सादर करून त्याचा पाटपूरावा करण्याचे आवश्‍वासन दिले.  याचबरोबर धोत्रा नाईक येथीलच या आपघातात जखमी झालेले अनिल राठोड व आशिष जाधव यांचेही घरी जावून त्यांची सात्वनपर भेट घेतली. यावेळी चिखली  तालुका कॉगे्रस कमिटीचे पदाधिकारी उपस्थिती होती.