Breaking News

आयुर्वेद मेडीकल कॉलेजच्या वतीने आयुर्वेद दिन

बुलडाणा (प्रतिनिधी), दि. 04 -  स्थानिक  आयुर्वेद मेडिकल हॉस्पीटल यांच्या वतीने शुक्रवार 28 ऑक्टोंबर रोजी धन्वंतरी जयंती निमित्त पहिला आयुर्वेद दिन  बुलडाणा बसस्थानक परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने रुग्णालयात चालविण्यात येणार्‍या मधुमेह उपचार शिबिर व रक्तशर्कर तपासणी  शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी भित्तीपत्रके पत्रिका व आयुर्वेद, मधुमेहाच्या आयुर्वेद विषयी माहिती देणारे पॉवर पाईंट प्रेझेंटेशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी  वस्त्रोध्योग महामंडळाचे अध्यक्ष ना.रविकांत तुपकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र वाघ, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळे, पत्रकार रणजीतसिंह राजपूत,  अरून जैण, चांदुरकर, संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ.राजेश्‍वर उबरहांडे, संचालिका डॉ.सौ.स्वाती उबरहांडे, निमा बुलडाणाचे डॉ.गजानन पडघान, सचिन पंजाबराव इलग,  डॉ.ठाकुर, डॉ.पाटील, डॉ.बुधवत, डॉ.दिनेश अग्रवाल, डॉ.राऊत, डॉ.सौ.पडघान, डॉ.जोशी, प्रा.पालवे , पनसकर, खोलगडे आदी मान्यवर उपस्थित होते.  प्रास्ताविकात डॉ.राजेश्‍वर उबरहांडे यांनी आयुर्वेद शास्त्र काळाच्या कसोटीवर उतरलेले व विज्ञानाच्या निकषावर खरे ठरलेले शास्त्र असुन महाविद्यालयातर्फे  आयुर्वेद सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल असल्याचे सांगीतले. तर अध्यक्षीय भाषणात ना.रविकांत तुपकर यांनी आयुर्वेद व आहार  विहाराचे महत्व विषद करून शासन आयुर्वेदाच्या पाठीशी आहे. असे मत व्यक्त केले. तसेच पत्रकार रंजितसिंह राजपुत, राजेंद्र काळे, अरून जैन, डॉ.पडघान  यांनी आयुर्वेद जनमानसात रूजविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र वाघ यांनी आयुर्वेद महाविद्यालयाची भुमीका निषद केली.  संचालन प्रितम ठाकुर यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ.सौ.स्वाती उबरहांडे यांनी केले.