नगर जिल्हा व जळगाव जिल्हा क्रिकेट सिरीजमध्ये नगरचा संघ विजेता
अहमदनगर, दि. 20 - अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा संघ (14 वर्षांखालील) व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा संघ (14 वर्षांखालील) यांच्यात मधुकरराव गायकवाड स्टेडियम, निंबळक येथे 3 सराव सामने खेळविण्यात आले. यामध्ये अहमदनगरच्या संघाने 2 सामने जिंकून सिरीज 2/1 अशी जिंकली. खेळाडूंचा सराव होण्याच्या दृष्टीने या सिरीजचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती गणेश गोंडाळ व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांनी दिली. या सामन्यात प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देण्यात आले, तसेच मॅन ऑफ द सिरीज व विजेत्या संघाला ट्रॉफी देण्यात आली.
अ.नगर जिल्हा क्रिकेट असो. व जळगाव जिल्हा क्रिकेट असो. यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यांत नगरच्या संघाने बाजी मारली. नगरच्या संघास जळगाव संघाचे कोच व माजी रणजीपटू अविनाश आवारे यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली.
पहिल्या सामन्यात अहमदनगरच्या संघाने 45 षटकांत 165 धावा (9 गडी बाद) केल्या. अशकान काझीने 51, आदित्य खेडकरने नाबाद 22 धावा केल्या, तर नचिकेतने 22 धावांत 2 गडी केले. जळगाव संघाने 44 षटकांत सर्वबाद 141 धावा केल्या. त्यांच्या ओम मुंडेने 53, आदित्य खेडकरने 16 धावांत 4 बळी घेतले. या सामन्यात नगरचा संघ विजेता ठरला.
दुसर्या सामन्यात जळगावच्या संघाने 45 षटकांत सर्वबाद 128 धावा केल्या. त्याचा पाठलाग करीत नगरच्या संघाने दमदार खेळ करीत 43 षटकांत 7 बाद 130 धावा करून सामना जिंकून सिरीजवर विजेतेपदाची मोहोर लावली.
अंतिम व तिसर्या सामन्यात जळगाव संघाने 35 षटकांत 1 बाद 148 धावा केल्या, त्या बदल्यात नगरचा संघ 35 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 147 धावापर्यंत मजल मारू शकला. हा सामना जळगावच्या संघाने 1 धावाने जिंकला.
दोन्ही संघांना 14 वर्षांखालील जळगाव संघाचे कोच व माजी रणजीपटू अविनाश आवारे यांनी मार्गदर्शन केले. सामने यशस्वीतेसाठी भरत पवार, संदीप आडोळे, मिनीनाथ गाडीलकर, आकाश थोरात, संदीप पिल्ले, शाहरुख सय्यद, राहुल लवांगे यांनी प्रयत्न केले. अहमदनगर जिल्हा क्रिकेट असो.चे अध्यक्ष आमदार अरुण जगताप यांनी दोन्ही संघांचे अभिनंदन केले आहे.