Breaking News

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

पुणे, दि. 20 -  रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाउन आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मावळातील टाकवे बुद्रूक येथील न्यू इंग्लिश  स्कूलमधील पंचवीस विद्यार्थ्यांना बुधवारी (दि. 16) सायकलींचे वाटप करण्यात आले. 
पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना शाळेसाठी पायपीट करावी लागते. त्यांना वाहतुकीचे साधन उपलब्ध नाही. याच कारणामुळे अनेक विद्यार्थी सातवीनंतर शाळा  सोडतात. ते टाळण्यासाठी रोटरी क्लबच्या वतीने हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना साकलींचे वाटप करण्यात आले.  या वेळी सरपंच सुवर्णा शिंदे, स्वामी जगताप,  प्रादेशिक परिवहनचे नवृत्त अधिकारी हरिश्‍चंद्र गडसिंग, रोटरी पिंपरी टाऊनचे अध्यक्ष चिंतामणी अभ्यंकर, रोटरी तळेगाव सिटीचे अध्यक्ष विलास काळोखे, अनिल  नवले, बाळकृष्ण उर्हे, सारंग माताडे, राम भोसले, सदाशिव काळे, प्रदीप वाल्हेकर, रवींद्र भावे, शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब उभे, माजी उपसरपंच रोहिदास  आसवले, दिलीप पारेख, शशिकांत हळदे, दादासाहेब उर्हे, अनिल नेवाळे, मारुती आसावले आदी उपस्थित होते.