Breaking News

राष्ट्रसेवा समूह चालवणार शेकापचे कार्य

पुणे, दि. 20 - राष्ट्रसेवा समूहाच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सर्वच गट-गणात लढविण्याचे बुधवारी (दि.16) झालेल्या बैठकीत  ठरले असल्याची माहिती समूहाचे संस्थापक अध्यक्ष राहुल पोकळे यांनी सांगितले.गेल्या 15 वर्षांपासून राष्ट्रसेवा समूह ही संघटना अध्यक्ष राहुल पोकळे यांच्या  नेतृत्वाखाली शिव-फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचारांचे कार्य पुणो व परिसरात करत आहे. विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमातून वेगळा ठसा त्यांनी उमटविला  आहे. शिवजयंती सोहळा, शिवराज्याभिषेक सोहळा, समता रॅली, विधवा महिला मेळावा, सत्यशोधक शिव विवाह, विविध सामाजिक मेळावे, जयंती-पुण्यतिथी,  शिबिरे, विविध जीवनावश्यक विषयावर आंदोलने, मोर्चे, व्याख्यानमाला तसेच गेल्या 2 वर्षांपासून अविरतपणो चालत असलेली जिजाऊ रथयात्रा व संविधान  जनजागृती यात्रा या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचले असून वेगळी ओळख व पर्याय निर्माण केला आहे.याच संघटनेने आता कोणत्याही प्रस्थापित पक्षात न  सहभागी होता, या भागात नवीन पर्याय म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे कार्य पुढे चालवण्याचे ठरवले आहे, तसेच त्याची रितसर जाहीर घोषणा व प्रवेश येत्या  काही दिवसात होणार आहेत. त्या संदर्भात नुकतीच राष्ट्रसेवा समूहाच्या निवडक विविध तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक डेक्कन पॅव्हेलियन येथे पार पडली.  बैठकीला असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते व एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. या नवीन निर्णयामुळे या भागातील राजकीय समिकरणो नक्कीच बदलतील  व निवडणुकीला नवीन रंग येईल, अशी चर्चा रंगू लागली आहे.